Salman Khan : बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी…


Salman Khan : माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिश्नोई गँगचा यामध्ये हात असून या प्रकरणात नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. अभिनेता सलमान खान आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे.

अशातच आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोन करणाऱ्याने पाच कोटी रुपये किंवा बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट अवस्था करेन अशी धमकी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता हा प्रँक असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई ट्राफिक पोलिसांना आलेल्या फोनवर सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावे धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने मुंबई ट्राफिक पोलिसांच्या व्हॉटसअप नंबरवर मेसेज पाठवलाय. यात सलमान खानकडून पाच कोटी रुपये मागण्यात आले आहेत. Salman Khan

मेसेज पाठवणाऱ्यानं लॉरेन्स बिश्नोई गँगचा हवाला दिलाय. सलमान खानला जिवंत रहायचं असेल आणि लॉरेन्स बिश्नोई गँगसोबतचं शत्रुत्व संपवायचं असेल तर पाच कोटी रुपये द्यावे लागतील.

धमकी देणाऱ्याने असंही म्हटलंय की या मेसेजला हलक्यात घेण्याची चुकी करू नका. पैसे दिले नाहीत तर त्याची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट होईल. मुंबई पोलिसांना आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!