कोयत्याचा धाक दाखवून डिलिव्हरी बॉयला लुटणार्‍या गुंडाला सहकारनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या..


पुणे : कोयत्याचा धाक दाखवून झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून जबरदस्तीने लिफ्ट घेऊन त्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटणार्‍या गुंडाला सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटन बालाजीनगर येथील सागर लॉज ते चव्हाणनगरमधील शनि मंदिर दरम्यान बुधवारी रात्री अकरा वाजता घडली आहे.

हर्षद राजेंद्र देशमुख (वय २७, रा. चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी यश नथु कदम (वय २२, रा. आंबेगाव पठार) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. सागर लॉजमध्ये ते बुधवारी रात्री पार्सल देऊन परत आले. मोटारसायकलवरुन जात असताना हर्षद देशमुख हा अचानक त्यांच्या मोटारसायकलवर बसला. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून माझे नाव हर्षद देशमुख आहे.

मी इथला भाई आहे. तू जर मला चव्हाणनगर येथे नेऊन सोडले नाही तर तुला मारुन टाकेन, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यांना मोटारसायकल चव्हाणनगरमधील शनि मंदिराजवळ घेण्यास भाग पाडले.

तेथे आल्यावर फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तेथे जमलेल्या लोकांच्या दिशेने हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली. पोलिसांनी देशमुख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पोठारे तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!