26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी भिडणारे सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक; 3 जानेवारीला स्वीकारणार जबाबदारी

पुणे :महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या सर्वोच्च पदाबाबत सुरू असलेली उत्सुकता अखेर संपुष्टात आली आहे.वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची राज्य सरकारने महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या येत्या 3 जानेवारी 2026 रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी सदानंद दाते राज्याच्या पोलिस दलाची सूत्रे हाती घेणार आहेत.

सदानंद दाते कोण आहेत?

1990 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते आहेत. 2015 मध्ये त्यांची सीआरपीएफच्या महासंचालकपदी नियुक्ती होती. 26/11 च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी आयपीएस सदानंद दाते यांच्या धाडस दाखवून अनेक नागरिकांचे प्राण वाचले होते. कामा आणि अल्ब्लेस रुग्णालयातून महिला आणि मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्यांनी दाखविलेल्या धाडसासाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आलं.

CRPF चे स्पेशल आयजी म्हणून दाते यांनी जबाबदारी पार पाडली. यानंतर ते सीआरपीएफमध्ये डीजी म्हणून 5 वर्षे प्रति नियुक्तीवर असताना मोलाची भूमिका पार पाडली. यानंतर त्यांच्याकडे एनआयएचे महासंचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. सदानंद दाते यांची ओळख एक अत्यंत शिस्तप्रिय आणि,धाडसी अधिकारी म्हणून आहे.
आता येत्या 3 जानेवारीला सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्याच मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
