Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांची पुन्हा जीभ घसरली, आता राज्यातील बड्या नेत्याला म्हणाले, डुक्कर..


Sadabhau Khot : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.

महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, असं संजय राऊत म्हणालेत. याच टीकेला आमदार सदाभाऊ उत्तर दिले आहे.

आमदार सदाभाऊ म्हणाले, संजय राऊतला गावगाडा माहिती नाही, त्यामुळे राखण करणारा कुत्रा म्हणजे काही माहित नाही. पण तुम्ही २०१४ आणि २०१९ ला नरेंद्र मोदी यांचा फोटो गळ्यात अडकवून मतांचा जोगवा मागत गावोगावी फिरत होता, असा पलटवार आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. Sadabhau Khot

तसेच शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर केलेल्या टीकेवर सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सदाभाऊ खोत यांना अत्यंत कडक शब्दात फटकारले आहे.

चौफेर टीकेनंतर सदाभाऊ खोत यांनी नरमाईचे धोरण स्वीकारत दिलगिरी व्यक्त केली. मात्र, संजय राऊत यांनी थोबाडीत द्यायला हवी होती, अशी टीका करताच सदाभाऊंनी आता संजय राऊत यांची तुलना डुकराशी केली आहे.

सदाभाऊ यांनी म्हटलं आहे की, २१९ मध्येही तुम्ही भाषण करत होता. सत्तेत आल्यावर तुम्ही पहिला खंजीर हातात घेतला. तुमच्यात इमानदारपणा आहे का शोधा आणि कुत्र्याएवढा जरी इमानदारपणा असता तर महाराष्ट्रान तुमचं कौतुक केले असते.

दरम्यान, तरीही मला त्याच्यावर जास्त काही बोलायचं नाही कारण डुकराला कितीही साबण शांपू लावला तरी डुक्कर गटारातच जातं, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!