दु:खद ! बोरीभडक येथील प्रसिद्ध उद्योजक जिवन आतकीरे यांचे निधन ….

उरुळीकांचन : बोरी भडक (ता. दौंड ) येथील उद्योजक जिवन विलास अतकिरे (वय. ३५) यांचे सोमवार (दि.८) रोजी अल्पशा आजाराने दुःखद असे निधन झाले आहे.

ते गेल्या वर्षापासून ते कर्करोगसारख्या आजाराशी झुंज देत होते.सोमवारी त्यांची आजाराशी प्रावणज्योत मालवली आहे. त्यांनी धैर्याने शेवटपर्यंत आजाराशी झुंज दिली होती. ती झुंज अपुरी ठरली आहे.
यशस्वी बांधकाम व्यवसायिक व सार्वजनिक जीवनात वावणारे शांत , संयमी छबी अशी त्यांची ओळख उरुळीकांचन परिसरात होती. त्यांच्या अकस्मित निधनाने त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांचे कुटूंब हे दौंडचे आमदार राहुल कूल यांचे समर्थक राहिले आहे. तर त्यांचे बंधू विकास अतकिरे यांनी बोरीभडक गावचे उपसरपंचपद भूषविले आहे.
Views:
[jp_post_view]