महात्मा गांधी सर्वोदय संघाचे महात्मा गांधी विद्यालयाचे माजी प्राचार्य अरविंद खिरे सर यांचे दुःखद निधन…

पुणे : महात्मा गांधी सर्वोदय संघाचे महात्मा गांधी विद्यालयाचे माजी प्राचार्य अरविंद खिरे सर यांचे यांचे अल्पशा आजाराने दुःखद असे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. विद्यार्थ्यां प्रती प्रेम कळकळ निष्ठा व निस्वार्थी सेवा भावनेतून त्यांनी आपले काम केले.
अध्यापनात इंग्रजी व मराठी भाषेवर अत्यंत प्रभुत्व होते. 1972 रोजी उपशिक्षक म्हणून विद्यालयात रुजू झाले. विद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले व सेवानिवृत्त झाले 29 वर्षे 9 महिने कालावधीत काम करत असताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले.
तसेच साहित्यामध्ये सुद्धा अत्यंत आवड असल्याने त्यांनी अध्यापनाच्या सेवेबरोबर मराठी साहित्यामध्ये एकेक किरण तेजाचा समईच्या शुभ्र कळ्या असे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. पूज्य मणिभाई देसाई यांची ओळख करून देणारे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
बासरी वादन करणे हा त्यांचा छंद होता. तो त्यांनी अखेरपर्यंत जोपासला. अनेकांना त्यांनी आपल्या बासरी वाद्यातून मंत्रमुग्ध करून सोडत असत. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.