Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डची गोळी झाडून आत्महत्या, धक्कादायक माहिती आली समोर…

Sachin Tendulkar : क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे अंगरक्षक राहिलेले सीआरपीएफ जवान प्रकाश कापडे यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

जामनेर येथील जळगाव रस्ता गणपती नगर या ठिकाणी रहिवासी असलेल्या प्रकाश कापडे यांनी आपल्या राहत्या घरीच डोक्यात गोळी झाडून घेत, आपले जीवन संपवले. कापडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
काश गोविंदा कापडे (३७, रा.गणपती नगर,जामनेर) असे मृत जवानाचे नाव आहे.

यापूर्वी त्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ व क्रिकेट खेळाडू सचिन तेडुलकर यांच्याकडे अंगरक्षक म्हणून काम केले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिण असा परिवार आहे. Sachin Tendulkar
दरम्यान, कापडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या कापडे हे सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षा रक्षकाचे काम करत होते.
गेल्या आठ दिवसांपासून ते गावी आले होते. आज पहाटे त्यां नी आत्महत्या केली. याची खबर पसरताच लोकांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.