Russian River : मोठी बातमी! रशियात मेडिकल शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रातील चार विद्यार्थी नदीत बुडाले, कुटूंबाला एकच धक्का…


Russian River : रशियात चार भारतीय विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. रशियामधील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते.

हर्षल अनंतराव देसले, गुलाम मोहम्मद याकूब मलिक, जीशान अशपाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, एकजण नदीमध्ये उतरला होता. मात्र, तो नदीत बुडायला लागल्यामुळे त्याला मदत करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचाही बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.

या विद्यार्थ्यांचे मृतदेह लवकरात लवकर भारतात आणले जाणार आहेत. जळगाव येथील अधिकाऱ्यांकडून रशियातील स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्यात येत आहे. तसेच भारतीय दूतावासाच्या माध्यमातून रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

या घटनेत एक विद्यार्थीनीही नदीत पडली होती. मात्र, तिला वाचवण्यास यश आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.या घटनेबाबत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेसंदर्भात पुष्टी केली असल्याची माहिती आहे.

दरम्यान, ही घटना ४ जून रोजी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्ग जवळ असलेल्या नदीत ही घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर रशिया येथील प्रशासन आणि पोलिसांवतीने भारतीय दूतावासाला या घटनेबाबत कळवण्यात आलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!