घरी जाण्याची लगबग, बसची लाईन आणि प्रवाशांच्या मोठ्या किंकाळ्या….; भरधाव बेस्ट बसने 13 जणांना चिरडलं, 4 जणांचा मृत्यू


मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीची धामधुम सुरू असताना भांडुप रेल्वे स्थानकाजवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना भरधाव बेस्ट बसने चिरडलं आहे. या अपघातात दहा ते बारा जणांना बसने उडवल असल्याची माहिती समोर आली आहे.या दुर्घटनेमध्ये बसखाली सापडून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृताचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बस डेपोजवळ संध्याकाळच्या सुमारास नोकरदार आपल्या घराकडे जाण्यासाठी बसच्या रांगेत उभे होते. त्याचवेळी अचानक एक बेस्टची बस भरधाव वेगात आली आणि रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडून पुढे गेली.या बेस्ट बसने रांगेत उभ्या असलेल्या १३ जणांना चिरडलं. या दुर्घटनेमध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर घटनास्थळी आणखी प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

बसवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखक केलं आहे.प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, बेस्टची बस ही नियंत्रणाबाहेर गेली होती. बस स्टॉपवर २० ते २५ जण रांगेत उभी होती. त्यावेळी ही बस आली आणि तिने रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडलं आणि पुढे निघून गेली.

ती बस इतकी जोरात की पुढे गेल्यावर ती एका विजेच्या खांबाला जाऊन धडकली. या बसचा वेग इतका होता की, धडकेनंतर विजेचा खांब ही कोलमडला. बस अनियंत्रित झाली होती, त्यामुळे हे सगळं घडलं असावं, असं प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं. या घटनेमुळे भांडुप मध्ये खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!