रुपाली ठोंबरेंचं अखेर ठरलं! कोणत्या पक्षात प्रवेश करणार? फोटोतून संकेत दिल्याच्या चर्चा…


पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये कमालीचा वाद पेटला होता. दोन्ही महिलांमध्ये नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला होता.

पण, त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रुपाली ठोंबरे यांना काही दिवसांपूर्वी पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीत रुपाली ठोंबरे अस्वस्थ असून त्यामुळे रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा रंगली होती, त्यातच आता रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अस्वस्थ असलेल्या रुपाली ठोंबरे नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते, त्यानंतर आता ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्या अजित पवारांच्या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, तर पक्षाकडून काही गोष्टींची दखल घेतली जात नसल्याचंही त्यांनी एका मुलाखतीवेळी म्हटलं होतं.

       

रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंट फेसबुकवरती एक पोस्ट केली आहे,त्यामध्ये दोन फोटो देखील पोस्ट केलेले आहेत, त्या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये आपल्या विरोधकांवर त्यांनी निशाणा साधला आहे.रुपाली ठोंबरे यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं की, पहिला फोटो 2005 मधील आहे बरं का. तेव्हापासून समाजात, राजकारणात स्वतःच्या जीवावर मनगटाच्या ताकदीवर आणि कामाच्या जोरावर काम करण्यास सुरुवात केली.

दुसरा फोटो महाराष्ट्रातील ज्येष्ठ, दिग्गज नेते, जबरदस्त आवडते नेते हिंदुह्रदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि मा. शरदचंद्र पवार साहेब. त्यामुळे आयरे गैरे नथू खैरे,नटरंगी लोकांनी शिकवू नयेच, असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे. या पोस्टनंतर आता रूपाली पाटील कोणता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का? अशा चर्चा सुरू आहेत.

रुपाली ठोंबरे यांनी पोस्टमध्ये शरद पवार यांच्यासोबत आपला एक फोटो पोस्ट केला आहे, तर दुसऱ्या फोटोत शरद पवार आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो आहे. दोन्ही फोटोत शरद पवार दिसत आहेत, त्यामुळे रुपाली ठोंबरे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणार का?, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. तसंच या फोटोंमधून आणखी एक शक्यता वर्तवली जात आहे.

त्याचबरोबर रुपाली ठोंबरे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची देखील चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा अंदाज वर्तवला जात आहे.

अशा स्थितीत त्यांनी आज सोशल मीडिया पोस्टमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर केल्यामुळे त्या शिवसेना प्रवेशाच्या तयारीत आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या दोन फोटोवरून त्या शिवसेना शिंदे गटात किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याबाबतचे तर्क वितर्क लावले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!