Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविषयी सोशल मीडियावर अश्लील वक्तव्य, दोघांना अटक…


Rupali Chakankar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. रूपाली चाकणकर यांच्या वतीने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अश्लील पोस्ट करणाऱ्या ३२ जणांची लिस्ट सायबर क्राईमला देण्यात आली होती.

त्यानुसार ठाणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. सनी पारखे याला गंगापूर येथून तर हाटे याला चुनाभट्टी मुंबई येथून अटक केली आहे

तसेच याआधीही चाकणकर यांच्यावर समाजमाध्यमात अश्लील मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी वसंत रमेशराव खुळे (वय ३४. रा. रहाटी, ता.जि.परभणी) याचा शोध घेतला असता आरोपी रहाटी येथे असल्याची माहिती मिळाली. Rupali Chakankar

पोलिसांच्या पथकाने रहाटी येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याला सायबर पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब नोंदवून घेत फोन जप्त केला. त्याला सीआरपीसी प्रमाणे नोटीस देण्यात आली होती. तसेच प्रदीप कणसे यानेही अश्लील भाषेत समाजमाध्यमात कमेंट केल्याने त्यालाही नोटीस देण्यात आली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!