Rupali Chakankar : आमदारकी न भेटल्याने नाराजी, महायुती सरकारने दिली दुसरी मोठी जबाबदारी, रुपालीताईंना लागली लॉटरी….


Rupali Chakankar : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

तसेच आचारसंहिता लागू होण्याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत होतं. पण छगन भुजबळ यांच्या मुलाची वर्णी लागली.

रुपाली चाकणकर यांची आमदारकीची संधी हुकली असली तरी त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आलीय. आता चाकणकर या पुढची तीन वर्षे आयोगाच्या अध्यक्षपदी कामय राहतील. Rupali Chakankar

राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी रुपाली चाकणकर यांचंही नाव चर्चेत होतं. पण छगन भुजबळांनी आपल्या मुलासाठी हट्ट धरल्याने मग रूपाली चाकणकर यांचे नाव मागे पडले. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी पुन्हा संधी मिळवली आहे.

दरम्यान, राज्यात निवडणुकीनंतर सत्ताबदल झाला तरी रुपाली चाकणकर यांचे पद मात्र कायम राहील. रुपाली चाकणकर या पुढची तीन वर्षे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. प्रोटोकॉलनुसार या पदाला राज्यमंञीपदाचा दर्जा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!