लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडुन “रन फॉर युनिटी आणी एकता दिवस” मॅरेथॉन कार्यक्रमाचे आयोजन.


लोणी काळभोर : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडुन “रन फॉर युनिटी आणी एकता दिवस” मॅरेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.

सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती ३१ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार असुन देशात एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आपल्या समर्पणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बळकटी देण्यासाठी हा एक संदेश देण्यासाठी देशभर या एकता दौंडचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यानिमित्ताने पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-५ राजकुमार शिंदे व अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडुन ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता लोणी काळभोर पोलीस स्टेशन स्टेशनसमोर, लोणी काळभोर याठिकाणी “रन फॉर युनिटी आणी एकता दिवस” मॅरेथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

त्याचा मार्ग लोणी काळभोर पोलीस स्टेशन -श्रीदत्त मंदीर चौक-रायवाडी रोडमार्गे श्रीमंत अंबरनाथ मंदीर समोरून रामदारारोड पाषाणकर बाग चौक -पालखी मैदान कदमवाक वस्ती, हवेली, पुणे याठिकाणापर्यंत ३ कि.मी. असे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे वतीने पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या मॅरेथॉन कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!