रमीचा डाव कोकाटेंना भोवणार ; कृषी खातं काढून घेतलं जाणार की खातेबदल? मोठी माहिती समोर…

पुणे : गेल्या काही दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता त्यांच्याकडून कृषी खातं काढून घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात बैठक झाली होती, यात कोकाटे यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांचे खाते बदलले जाणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळात मोबाईलवर गेम खेळण्यासह त्यानंतर केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल कोकाटे यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. कोकाटे यांच्याकडून कृषी खात काढून घेतल जाणार असून त्यांचे मंत्रिपद अबाधित राहणार आहे. त्यांना आता दुसऱ्या एका खात्याचे मंत्री बनवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे खातं सध्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे आहे. तर भरणे यांना आता कृषिमंत्रीपदाचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे.
