गुरुपौर्णिमेच्या दिवशीच शाळेत राडा!! विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांचा केला मर्डर, घटनेने राज्य हादरलं…

एका शाळेच्या मुख्याध्यापकाची विद्यार्थ्यांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गुरूपौर्णिमेच्या दिवशीच ही घटना घडली आहे. शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनीच मुख्याध्यापकांना चाकूने भोसकले.

जगबीर सिंह पन्नू असे हत्या झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. चुकीच्या कृत्यामुळे त्यांना मुख्याध्यापकाने ओरडले होते. यामुळे विद्यार्थ्यांना याचा राग आला होता. यामुळे त्यांनी मुख्याध्यापकांवर चाकूनं अनेक वार केले. त्यानंतर ते पळून गेले.

ही घटना हरियाणात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. विद्यार्थ्यांच्या मनात भीती बसली आहे. आरोपी अकरावीत शिकत होते. पन्नू यांनी केस कापण्यावरुन आणि गणवेशाच्या स्वच्छतेवरुन विद्यार्थ्यांना खडसावले होते. याचा विद्यार्थ्यांना राग आला.

पन्नू अन्य विद्यार्थ्यांनादेखील ओरडले होते. आरोपींनी याचा राग मनात ठेवला आणि संधी मिळताच मुख्याध्यापकांची चाकूनं भोसकून हत्या केली. त्यानंतर ते शाळेतून पळून गेले. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. पोलीस सध्या आरोपींना शोधत आहे.
दरम्यान, सध्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शाळेचे दोन विद्यार्थी बाहेर पळताना दिसत आहेत. पुट्ठी गावचे रहिवासी असलेल्या पन्नू यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी पन्नू यांना मृत घोषित केलं. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.
