पुण्यातील पौंडमध्ये राडा! शाळेत शिरून पालकाची विद्यार्थ्याना मारहाण, नेमकं प्रकरण काय?

पुणे : येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील पौड गावात असणाऱ्या झील शाळेत विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका पालकाने विद्यार्थांना शाळेत शिरून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत तपास सुरू आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून विद्यार्थ्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. यामध्ये नेमकं घडलं काय? असा प्रश्न उपस्थित अनेकांना पडला असताना काही समजत नव्हते. यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. याठिकाणी सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

याबाबत या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार आता तपास सुरू करण्यात आला असून इतर विद्यार्थी देखील या घटनेमुळे गोंधळून गेले आहेत. याबाबत नेमकं कारण अजून समोर आले नाही. याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, यावेळी संबंधित पालकाने विद्यार्थांना प्रवेश शाळेच्या बाहेर या तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे याबाबत तपास सुरू आहे. याबाबत शाळेकडून देखील कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
