मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात राडा! आमदार रोहित पवार पोलीस अधिकाऱ्यावर संतापले, म्हणाले, आवाज खाली करा, हातवारे केले तर…


मुंबई : शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचे नाही, अशा शब्दात कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले आहे. आवाज खाली, हातवारे करुन आमदारासोबत बोलायचे नाही, असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला.

तसेच गुरुवारी विधानभवन परिसरात झालेल्या वादग्रस्त हाणामारीनंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्या घटनेतील पुढील नाट्यमय घडामोडींकडे. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी एका पोलीस अधिकाऱ्यावर थेट संताप व्यक्त केला आणि त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा संपूर्ण प्रकार मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात घडला. यावेळी रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. एक पोलीस अधिकारी रोहित पवारांशी बोलताना हातवारे करत असल्याचे दिसताच पवारांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट सांगितले, “हातवारे करू नका… आवाज खाली ठेवा… शहाणपण करू नका…, अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं घडलं काय?

गुरुवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक नितीन देशमुख यांना मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रात्री पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक केली. ही घटना समजताच जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार तातडीने मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात पोहोचले.

यावेळी रोहित पवार आणि एका पोलीस अधिकाऱ्यांत बाचाबाची झाली, ज्यात पवार आक्रमक होते. पोलीस अधिकाऱ्याने हातवारे करत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता रोहित पवार यांनी आवाज वाढवून “बोलता येत नसेल, तर बोलू नका!” अशा शब्दांत त्या अधिकाऱ्याला सुनावलं. यामुळे पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!