स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या रुममेटने केला घात! तब्बल 5 लाखांना लावला चुना, मैत्रिणीने कॉल्ड कॉफी पाजली अन्…; पुण्यातील घटना…

पुणे : पुण्यात कोल्ड कॉफीमधून मैत्रिणीला गुंगीच औषध देऊन पाच लाखांचे दागिने कंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मैत्रिणींनाच केलेल्या प्रकारामुळे पुण्यात हा विषय चर्चेचा ठरला आहे.
नेमकं घडलं काय?
दोघेही मैत्री स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यातील सदाशिव पेठेत रूममेट होत्या. काही कालावधीनंतर दोघींची लग्न झालली आणि आता दोघीही आंबेगाव बुद्रुक आणि आंबेगाव पठार परिसरात राहतात. ज्या मैत्रिणीने पाच लाखांचे दागिने चोरले त्या मैत्रिणीला ऑनलाईन गेमिंगचा नाद असल्याचाही समोर आले आहे.
तसेच ६ मार्चला दुपारी चार वाजता आपल्या मैत्रिणीसाठी कॉल कॉफी घेऊन तिच्या घरी गेली त्यात गुंगीचा औषध मिसळलं आणि ते प्यायला नंतर दुसरी मैत्रीण बेशुद्ध पडली त्यानंतर कपाटात ठेवलेले पाच लाख ४६ हजार रुपयांचे दागिने मैत्रिणींने लंपास केले आणि काही दिवसांनी घरात चोरी झाल्याचे लक्षात आलं त्यानुसार तिने पोलिसात धाव घेतली.