रोहित शर्मा-विराट कोहलीला आयसीसीकडून मोठा झटका, ‘या’ महत्त्वाच्या यादीतून बाहेर?, क्रिकेट वर्तुळात खळबळ….

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताज्या वनडे क्रमवारीची घोषणा केली. या नव्या यादीनं क्रिकेटप्रेमींना अक्षरशः धक्का बसला आहे. वनडे क्रिकेटमधील दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली अचानक ICC च्या वनडे क्रमवारीतून गायब झाले आहेत.

भारतीय संघाचे कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली या दोघांना आयसीसीने वनडे रँकिंगमधूनच डच्चू दिला आहे. गेल्या आठवड्यातच या दोघांची स्थिती मजबूत होती. रोहित 756 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर तर विराट 736 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर होता.
पण केवळ काही दिवसांतच या दोघांचा वनडे रँकिंगमधून पत्ता कट झाला आहे. आयसीसीच्या नियमानुसार एखादा खेळाडू 9-12 महिने वनडे सामने न खेळल्यास किंवा निवृत्त झाल्यास त्याचा क्रमवारीत समावेश होत नाही. मात्र रोहित आणि विराट यांच्यावर हे नियम लागू होत नाहीत. कारण या दोघांनी पाच महिन्यांपूर्वी मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळले होते.

दरम्यान, त्याशिवाय हे दोघे फक्त कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये अजूनही त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे त्यांच्या रँकिंगमधून गायब होण्यामागे नियमांपेक्षा तांत्रिक कारण असावं, अशी चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तांत्रिक कारणामुळे झालं असावं. आयसीसीकडून लवकरच सुधारित रँकिंग जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांनी अजूनही आशा सोडलेली नाही. भारतीय संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या या जोडीचा क्रमवारीतून गायब होणं चाहत्यांना धक्का देणारं ठरलं आहे. पण पुढील काही दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.