दादांच्या अपघातावर रोहित पवारांचा लढा, व्हीएसआर कंपनीचे नाव घेत सुप्रिया सुळेंची मोठी मागणी…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात बारामती इथं निधन झाले. हा विमान अपघात नसून व्यापक कट असल्याचा आणि घातपात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी याविषयावर तीन पत्रकार परिषद घेतल्या आहेत. रोहित पवार यांनी हा मुद्दा लावून धरलेला असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी VSR कंपनीचे नाव घेत हल्ला चढवला आहे.
दरम्यान, DGCA च्या निर्णयावर खासदास सुप्रिया सुळे या व्यक्त झाल्या. मी विमान वाहतूक मंत्रालय आणि रोहित पवार यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील पुरुष गेला आहे. हे दु:ख पाच कुटुंबातील लोकांच आहे. ही वेळ दुसर्या कोणावर येऊ नये ही पांडुरंगाकडे प्रार्थना करते. अशा घटना घडत असतील तर तपासणी झाली पाहिजे.

रोहित पवार, जय पवार यांनी हा विषय लावून धरला. हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब आहे. ही एक सुरुवात आहे. मला हा पहिला रिपोर्ट आहे अस वाटतं. विमान वाहतूक मंत्री हे व्यवस्थित तपास करण्याच्या सूचना देतील. रोहित पवार यांच्या भावना समजू शकते. आमच्या घरात सगळे अस्वस्थ झाले आहेत. अजून पूर्ण रिपोर्ट पुढे येऊ द्या, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
या त्रुटी कोणामुळे झाल्या या सगळ्या समोर येतील 10 दिवसात संसद अधिवेशन सुरू होईल तेंव्हा हा मुद्दा उपस्थित करू. सगळ्याच विमानाचं ऑडिट झालं पाहिजे. काल परवा झारखंडमधे देखील असच विमान कोसळलं. रोहित पवार यांच्या आरोपाबाबत येत्या अधिवेशनात मुद्दा मांडणार आहोत. दादांचा अपघात, झारखंड अपघात, विमान वाहतूक मंत्री यावर सविस्तर चर्चा आणि सरकारचं स्टेटमेंट आलं पाहिजे, अशी मोठी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विमान कंपन्यांच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढले. सगळ्या कंपन्या नियमाने चालवली पाहिजे. कोणाच्या मनमानीने काहीही होणार नाही. पुढचे आठ दिवस वाट पाहू. सध्या चौकशी सुरु आहे, त्यामुळं आता अंतिम निर्णयवर येणे योग्य नाही. सगळ्या कंपन्या नियमाने चालवली पाहिजे. कोणाच्या मनमानी चालणार नाही असा मोठा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला.