मोठी बातमी! रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल, राज्यात खळबळ…!


बारामती : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. सरकारने साखर कारखान्यांचा हंगाम सुरू करण्याची तारीख निश्चित केली होती.

असे असताना मात्र रोहित पवार यांच्या साखर कारखान्याने नियोजित वेळेपूर्वी साखरेचा हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता चौकशी होण्याची शक्यता आहे.

मंत्री समितीच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती ॲग्रोचे नेते असलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

शेटफळगढ़े येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी ऊस हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते आमदार राम शिंदे यांनी केला. त्यानंतर या प्रकरणाची साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखा परीक्षकांमार्फत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

असे असताना मात्र, लेखापरीक्षकांच्या अहवालात तफावत आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दि. 8 मार्च 2023 रोजी बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्याविरुद्ध भिगवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!