पहलगाम हल्ल्यावर रोहित पवार यांचे मोठे विधान, म्हणाले, पाकिस्तानात घुसायचं तर घुसा पण…


जम्मू काश्मीर : काश्मीरच्या पहलगामल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत आता जम्मू काश्मीरमध्ये अलर्ट जारी केला असून याबाबत कसून तपास सुरू आहे. या घटनेचा जगभरातून निषेध केला जात आहे.

या घटनेनंतर आता मोदी सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानात घुसायचं तर घुसा, मात्र दहशतवाद्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार म्हणाले, पाकिस्तानात घुसायचं तर घुसा पण या दहशतवाद्यांचा विषय कायम स्वरुपी संपवा, मला असं वाटतं की काही लोक धार्मिक विषय पुढे घेऊन चाललेले आहेत, मात्र मदत करणारे पण मुस्लिम होते.

त्यामुळे यामध्ये धार्मिक मुद्दे घेऊ नये, दहशतवाद्यांना जात नसते, दहशतवाद्यांना धर्म नसतो, कुठलंही सरकार असो त्यांनी जर दहशतवाद्यांविरोधात निर्णय घेतला तर अख्खा देश त्यांच्या पाठीशी भक्कामपणे उभा आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात २६ लोकांना आपला जीव गमवावा लागला, आहे. या हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधु पाणी कराराला स्थगिती देण्यात आली आहे. अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या नागरिकांना व्हिसा मिळणार नाहीये, पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे, तसेच भारतामध्ये असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांमध्ये देश सोडावा असे आदेश देखील देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या या निर्णयाचा पाकिस्तानला मोठा फटका बसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!