Rohit Pawar : रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर कारवाई, रोहित पवार म्हणाले, कारवाईमागे ‘ते’ दोन नेते…

Rohit Pawar बारामती : बारामतीमधील बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार यांना रात्री २ वाजता नोटीस देण्यात आली. (Rohit Pawar)
तसेच नोटीस पाठवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन प्लांट बंद करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत. रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
यावर राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेऊन राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
राज्यात राष्ट्रवादी फुटल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे राज्यातील विरोधकांना विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादीतील फुटीर गटाला थेट अंगावर घेताना दिसत आहेत.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी परीक्षा आणि युरिया लिंकिंगच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. विरोधी पक्षनेता फुटल्यानंतर पुन्हा काय होणार? पक्ष कुमकुवत होणार का? अशा स्वरूपाचे जे अनेक प्रश्न राजकीय नेत्यांना आणि राजकीय निरीक्षकांना विश्लेषकांना पडले होते, ते रोहित पवारांनी धुळीस मिळवले.
सध्या रोहित पवार यांची युवकांच्या मनात क्रेझ बनली आहे आणि अशा परिस्थितीतच नेमकं गेल्या काही वर्षांपासून राज्यात जे होते, तेच रोहित पवारांच्या बाबतीत घडल्याचे दिसत आहे. रोहित पवार यांच्या कारखान्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रात्रीच्या दोन वाजता नोटीस बजावल्याचे कारण यामागे आहे.
रोहित पवारांनी मी राजकारणात आधी आलो नाही, मी व्यवसायात आधी आलो आहे. त्यामुळे तुम्हाला चुकीचे काहीच सापडणार नाही, अशा स्वरूपाचा इशारा देखील रोहित पवार यांनी देतानाच राज्यातील दोन बड्या नेत्यांकडे अंगुलीनिर्देश केला आहे.
आता हे दोन बडे नेते कोण? अशी चर्चा सध्या राज्यात सुरू झाली असून, या दोन बड्या नेत्यांमध्ये फक्त भाजप आहे की अन्य कोणी? याविषयी सध्या अटकळी बांधल्या जात आहेत. परंतू रोहित पवार यांचे सूचक ट्विट नेमके कोणाच्या विरोधात म्हणून चर्चेचे फड रंगू लागले आहेत.