Rohit Pawar : मोठी बातमी! रोहित पवारांना सर्वात मोठा धक्का, बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीची छापेमारी..

Rohit Pawar बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार अडचणीत आले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणेने छापेमारी सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळीच तपास यंत्रणेने पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीच्या पथकाने ६ ठिकाणी छापेमारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे बारामती आणि इतर ठिकाणी छापेमारी करण्यात आली.याआधी बारामती ॲग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस दिली होती.
यावेळी ७२ तासात प्लांट बंद करण्याच्या सूचना या नोटीसमध्ये देण्यात आल्या होत्या. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्विट करत मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाकडून त्यांनी स्थगिती मिळवली होती.
केंद्रीय तपास यंत्रणेकडून बारामती अॅग्रोसह सहा ठिकाणी झाडाझडती केली जात आहे. बारामती अॅग्रो या कंपनीत रोहित पवार हे कार्यकारी संचालक आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार हे अध्यक्ष आहेत. Rohit Pawar
दरम्यान, केंद्राचे तपासणी पथक सकाळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तपासणी सुरु केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या हे पथक ईडीचे आहे की कोणत्या दुसऱ्या तपास यंत्रणेचे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.