Rohit Pawar : अजित पवारांसोबत बैठक, सुप्रिया सुळेही उपस्थित आणि निर्णयही झाला, रोहित पवारांनी मानले दादांचे आभार….


Rohit Pawar : आज अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ही कालवा सल्लागार समितीची पाणीविषयक ही बैठक होती. या बैठकीविषयी रोहित पवार यांनी आपल्या एक्स हँडवरून माहिती दिली आहे.

तसेच रोहित पवार यांनी याबाबत अजित पवारांचे आभारही मानले आहेत. ते म्हणाले, सध्याची दुष्काळसदृष्य परिस्थिती पाहता कुकडी प्रकल्पातून १ मार्चपासून पाणी सोडण्याच्या पाठपुराव्याला यश आले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुकडी प्रकल्पातून १ मार्च रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे कर्जत तालुक्यातील ५४ गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबाबत अजितदादा यांचे माझ्या मतदारसंघाच्यावतीने आभार, अस म्हणत रोहित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

याबाबत पुढे बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, हे आवर्तन ४० दिवसांपेक्षा कमी असणार नाही. अन्यथा सर्व गावांना पाणी पोचणार नाही, आणि लोकांमध्ये नाराजी निर्माण होईल. तसंच घोड प्रकल्पातूनही १ मार्च रोजी पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. Rohit Pawar

तसेच यासोबत भीमा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी एप्रिलमध्ये भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार आहे. सीना धरणातही कुकडीचं पाणी सोडण्याचा मुद्दा यावेळी बैठकीत उपस्थित केला, असल्याचे रोहित पवार यांनी बैठकीत म्हटले आहे.

या बैठकीला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. तसेच जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. यंदा मोठ्या प्रमाणावर दुष्काळ परिस्थितीमुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!