Rohit Pawar : शरद पवार यांची बाजू घेणाऱ्यांना कामावरून काढण्याची धमकी? रोहित पवार यांच्या आरोपामुळे बारामतीत खळबळ..


Rohit Pawar : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे .

रोहित पवार यांनी ट्वीट करत धक्कादायक दावा केला आहे. शरद पवार यांच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तींना नोकरीवरुन काढण्याचा आणि दादागिरी करण्याचा प्रकार केला जात असल्याचा मोठा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे बारामतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील राजकीय संघर्ष आगामी काळात जास्त तीव्र होण्याचे संकेत मिळत आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीत हा संघर्ष जास्त तीव्र होण्याची शक्यता आहे. Rohit Pawar

दोन्ही गटाकडून बारामती लोकसभेचा उमेदवार निश्चित झालाय. शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर अजित पवार गटाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. असं असताना रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत.

रोहित पवार यांनी काय आरोप केला?

अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मीडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग मलिदा गँग करतेय.

आजवर कधी असं घडलं नाही, पण विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात असतील तर अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे, हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या मलिदा गँगनेही लक्षात ठेवावं, अशा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!