Rohit Pawar : नरेंद्र मोदी म्हणाले आम्हीच उसाचा एफआरपी वाढवला, शरद पवारांनी काय केलं? रोहित पवारांनी थेट पुरावाच दिला, नेमकं काय घडलं?


Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर रोज टीका करत आहेत. यामध्ये ऊसाला एफआरपी आम्हीच वाढवली असेही ते सांगत आहेत. यावरून रोहित पवार यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

रोहित पवार म्हणाले, मोदी साहेब, तुमचे teleprompter जुमलेबाज असले तरी थापा मारता मारता ते कधीतरी चांगल्या गोष्टी आठवण्यास भाग पाडते. तुमच्या teleprompter ने तुम्ही दहा वर्षात उसाची FRP २१० रुपयावरून ३४० रु केल्याचे सांगत तुमचे भरभरून कौतुक केले.

तुम्ही दीडपट म्हणजेच ६१% वाढ केली म्हणून इतके कौतुक करून घेत आहात तर मग पवार साहेब केंद्रात कृषिमंत्री असताना उसाची FRP दहा वर्षात ७४ वरून २२० रु केली. म्हणजे तिप्पट म्हणजे २००% वाढवली. Rohit Pawar

ऊसच नाही तर कापूस, सोयाबीन, फळबागा, कांदा उत्पादक अशा सर्वच शेतकऱ्यांनाही न्याय दिला. तर मग आम्ही किती कौतुक करायला हवे? मग आता तुम्हीच सांगा, शेतकऱ्यांना दिलासा कुणी दिला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मोदींनी सोलापूर, कोल्हापूर, पुणे, याठिकाणी सभा घेतल्या यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. यावर शरद पवार रोहित पवार देखील उत्तर देत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!