अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत!! बिनविरोध निवडणूक होण्यासाठी रोहित पवार मैदानात, केलं मोठं वक्तव्य..


बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्यानंतर आता बारामतीची पोट निवडणूक होत आहे. अनेकांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आवाहन केले आहे. असे असताना आता रोहित पवार यांनी देखील याबाबत आवाहन केले आहे.

याबाबत आमदार रोहित पवार म्हणाले, बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. यामुळे याबाबत सर्वांना त्यांनी विनंती केली आहे.

उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो.

याबाबत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तसेच ते म्हणाले, तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. यामुळे याबाबत अनेकांना त्यांनी विनंती केली आहे. सध्या काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!