अजितदादांसाठी रोहित पवार मैदानात! व्हायरल व्हिडिओवर म्हणाले, संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं…


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावल्याचा आरोप होत असून, त्यांचा फोनवरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

मात्र, त्यांच्या भावकीतूनच त्यांना साथ मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी काकांच्या समर्थनार्थ पुढे येत, या प्रकरणाला वेगळा रंग दिला जात असल्याचा आरोप केला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर लिहिले की, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा भागात मुरूमाच्या बेकायदेशीर उत्खननावरून झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळा ट्विस्ट देण्यात येत आहे. त्यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांनी अजित पवारांच्या स्वभावाबाबत भाष्य करताना म्हटलं की, अजितदादा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते सामान्यपणे बोलत असले तरी नवीन व्यक्तीला ते रागावल्यासारखे वाटू शकते. पण त्यांची कार्यशैली आणि स्वभाव गेल्या ३५-४० वर्षांपासून महाराष्ट्राला परिचित आहे.

दरम्यान, करमाळा घटनेत संबंधित महिला अधिकाऱ्याचीही चूक नसल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितलं की, त्यांचा स्वभाव सत्याला सत्य म्हणण्याचा आहे. मात्र मित्रपक्षांनीच हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडून अजितदादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!