Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांचे मोठे वक्तव्य, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्षावर म्हणाले…
Rohit Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रेने सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे. युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी रोहित पवार हे या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेत.
अमरावती जिल्ह्यामध्ये यात्रेदरम्यान रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. रोहित पवार म्हणाले, जे प्रश्न संघर्ष यात्रा घेऊन अधिवेशनावर जात आहे ते प्रश्न सुटले नाही तर याचे रूपांतर आंदोलनात करण्यात येईल. असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. Rohit Pawar
तसेच यावेळी बोलताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर देखील मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, निवडणूक येवू दया, मग घड्याळ कोणाकडे राहिलं हे समजेल. निवडणूक आयोगाला एकतर्फी निर्णय देता येणार नाही, आता फक्त अजित पवार मित्र मंडळ आहे, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.
भाजपासोबत जाण्याचा निर्णय जर पवार साहेबांचा असता तर पूर्ण पक्ष गेला असता, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले. मला पण सत्तेत जाण्यासाठी चान्स होता पण गेलो नाही. जेव्हा पक्षापेक्षा नेते मोठी होतात, तेव्हा असे वागायला लागतात. राष्ट्रवादी आमचा पक्ष आहे. बाकीचे सर्व मित्र परिवार आहे, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले