अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी रोहित पवार दिल्लीत तळ ठोकून, केजरीवाल यांची घेतली भेट…


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून ते याबाबत चौकशी करण्याची मागणी करत आहेत. आज त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.

यावेळी रोहित पवार म्हणाले, देशातील लढवय्ये नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल साहेब यांची दिल्लीत भेट घेऊन अजितदादांच्या विमान अपघाताबाबत त्यांच्याशी चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून याबाबत जमा केलेल्या संपूर्ण माहितीचं प्रेझेंटेशन त्यांना दिलं.

त्यांनीही याबाबतचे सगळे तपशील बारकाईने समजून घेतले. अजितदादांना न्याय मिळण्यासाठी आणि देशात अशी दुर्घटना पुन्हा घडू नये आणि त्यात कुणाचाही बळी जाऊ नये यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, त्यासाठी या विषयावर ‘आप’च्या खासदारांनी संसदेत आवाज उठवावा अशी विनंतीही रोहित पवार यांनी त्यांना केली.

त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या लढ्यात सोबत असल्याचा विश्वास दिला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार यांच्या अपघातावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यामुळे याबाबत सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!