Rohit Pawar : अमोल मिटकरी यांची रोहित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका, थेट लायकीच काढली, म्हणाले तुझी लायकी…

Rohit Pawar : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत कितीजण आहेत आणि शरद पवार यांच्यासोबत कितीजण आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. तसेच पवार कुटुंबातही शरद पवार यांच्या बाजूने काहीजण आहेत. तर अजित पवार यांच्याबाजूने काहीजण आहेत.
आता पवार कुटुंबातील सर्व सदस्य सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे. अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी सुळेंचा प्रचार सुरू केला आहे.
अशातच आता अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत गेल्याने हा गट सतत शरद पवार गटावर टीका करताना पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांच्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी टीका केली होती.
त्याला आता आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची थेट लायकीच काढली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
श्रीनिवास काका आणि सामान्य जनतेची भूमिका सारखेच आहे. आपल्या काकाला सोडून जाणे हे बरोबर नाही, असे सगळ्यांना वाटते. पवार साहेबांच्याच विचाराने चालणारे कुटुंब असल्याने आम्ही पवार साहेबांसोबत आहोत. पण अजित पवारांनी निर्णय घेत स्वतःला कुटुंबापासून दूर केले आहे. Rohit Pawar
ज्यांनी श्रीनिवास काका यांच्या विरोधात विधान केले आहे त्या व्यक्तीची नेमकी काय लायकी आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे मी मिटकरींवर बोलून वेळ वाया घालवणार नाही, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे.
रोहित पवारांच्या टीकेला अमोल मिटकरी यांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे. अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट करत असे म्हटले आहे की, “तू सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहेस दादा कष्ट करून इथपर्यंत आले आहेत.
ते तुला कराव लागल नाही, शेतकरी पुत्र म्हणून मरेपर्यंत आम्ही दादा सोबत आहोत. जोपर्यंत जयंत पाटील साहेब सोबत आहे, तोपर्यंत तू जबाबदारीचे पत्र घे कारण तुझी लायकी फक्त त्यांनाच माहिती आहे. बालबुद्धी हीच तुझी लायकी आहे,” अशी जहरी टीका मिटकरी यांनी केली आहे.