Robbery News : दिल्लीच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी, सोन्याचे व हिऱ्याचे दागिने चोरले, आकडा वाचून डोळे होतील पांढरे


Robbery News नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पॉश एरिया जंगपुरा येथे असलेल्या उमराव सिंग ज्वेलर्सचे शोरूम चोरट्यांनी फोडले आहे. Robbery News

तसेच भिंत फोडून चोरट्यांनी २५ कोटी रुपयांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने चोरून नेले आहे. दिल्लीतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चोरीने दिल्ली पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

स्ट्राँग रूमची भिंत कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि तेथे ठेवलेले सर्व दागिने घेऊन गेल्याची माहिती आहे. याप्रकरणी निजामुद्दीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. Robbery News

मिळालेल्या माहिती नुसार, जंगपुरा येथे उमराव सिंग ज्वेलर्सचे शोरूम आहे. शोरूमचे मालक महावीर प्रसाद जैन यांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी उशिरा शोरूम व्यवस्थित बंद करून ते गेले होते. जंगपुरा बाजार सोमवारी बंद राहतो. मंगळवारी सकाळी ते शोरूममध्ये पोहोचले असता शोरूमचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले.

संपूर्ण शोरूम रिकामे पडले होते. चोरट्यांनी शोरूमचे सीसीटीव्ही कॅमेरेही चोरून नेले होते. शोरूमच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीस तपासत आहेत. रविवारी महावीर प्रसाद जैन यांनी दुकान बंद केले होते आणि मंगळवारी सकाळी दुकान उघडले असता त्यांना दुकानात धूळ दिसली.

तपास केला असता चोरट्यांनी भिंत तोडून स्ट्राँग रूममध्ये प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले. सुमारे २०-२५ कोटी रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे मालकाचे म्हणणे आहे. ५ ते ७ लाख रुपये रोखही यात गुंतल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी शोरूमचे सर्व कर्मचारी ड्युटीसाठी आले. छताचे कुलूप तोडून चोरट्यांनी स्ट्राँग रूममध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांचे पथक आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे पीसीआर पथक घटनास्थळी पोहोचले. तसेच क्राईम टीम आणि फॉरेन्सिक टीमला तपासासाठी पाचारण करण्यात आले होते. दागिन्यांच्या शोरूममध्ये कोट्यवधींच्या चोरीच्या या प्रकरणामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांबाबत ज्वेलरी असोसिएशन लवकरच पोलिस आयुक्तांचीही भेट घेणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!