नवीन वर्षात रस्ते विकासाचे धोरण! महाराष्ट्राला नवीन ३ महामार्ग मिळणार, जाणून घ्या रूट…

मुंबई : सध्या राज्यात अनेक रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. असे असताना आता नव्या वर्षात काही नवीन महामार्ग प्रकल्पांची भेट मिळणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रात नितीन गडकरी मंत्री असल्याने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत आहे.
आता नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला, यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला, यानंतर भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा 2024 मध्ये सुरू करण्यात आला. याची कामे सुरू आहेत.
असे असताना मार्च 2025 मध्ये इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटरचा टप्पा सुरू होणार आहे. सध्या या टप्प्याचे फिनिशिंगचे काम सुरू आहे. यामुळे मार्चपासून नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास फास्ट होणार आहे. यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासात होणार आहे.
यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढणार आहे. तसेच मुंबई – पुणे प्रवास देखील नव्या वर्षात गतिमान होणार आहे. मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. ही मार्गिका खुली झाल्यास मुंबई – पुणे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. तसेच नव्या वर्षात विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, पुणे वर्तुळाकार रस्ता, जालना-नांदेड द्रुतगती मार्गासह अन्य कामे सुद्धा हाती घेतली जाणार आहेत.
यामुळे राज्यातील रस्ते विकासाच्या प्रकल्पांना गती मिळणार आहे. 2025 हे वर्ष रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी फारच महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे या काळात मोठे प्रकल्प सुरू होणार असून यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल, तसेच अंतर देखील कमी होईल. अनेक कामे ही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.