दुर्दैवी ! पुणे-मुंबई जुन्या मार्गावर बस दरीत कोसळून 8 ते 10 जण ठार

पुणे : मुंबई , गोरेगाव येथून ढोललेझीम खेळाची सुपारी घेऊन पिंपरी येथे खेळ करण्यासाठी चाललेल्या ढोल लेझीम पथकाच्या खाजगी बसचे नियंत्रण सुटून बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 ते 10 जणांचा मृत्यू झाला आहे.जुन्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शिंगरोबा मंदिराच्या पाठिमागे हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनूसार जुना पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये एक खाजगी बस दरीमध्ये कोसळलेली आहे. यामध्ये 40 ते 45 लोक असून यामधील सात ते आठ लोक मयत झाल्याचे व वीस ते पंचवीस लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व प्रवासी हे गोरेगाव मुंबई येथील असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर खोपोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Views:
[jp_post_view]