Riteish deshmukh : शिवजयंतीनिमित्त अभिनेता रितेश देशमुखची चाहत्यांना खास भेट, केली मोठी घोषणा…
Riteish deshmukh : रितेश देशमुखने शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित एका नवीन ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल अभिनेत्याने खास पोस्टर शेअर करत माहिती दिली आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यानं राज्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अभिनेता रितेश देशमुख यानं चाहत्यांना आणि शिवप्रेमींना शिवजयंतीनिमित्त एक खास भेट दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट येणार असून तो स्वत: या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.
रितेश आणि जेनिलिया या दोघांनीही या चित्रपटासंदर्भात पोस्ट केली आहे. या दोघांच्या या पोस्टमुळे पुन्हा एका शिवरायांच्या इतिहास हा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच या चित्रपटात कोणती स्टारकास्ट असणार याबाबत देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. Riteish deshmukh
या चित्रपटातील संगीताची जबाबदारी अजय-अतुल यांनी पेलवली आहे. तसेच ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी निर्मिती केलीये. या चित्रपटाचे छायांकन संतोष सिवन यांनी केलंय. तसेच हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
या चित्रपटाचा फर्स्ट लुक त्यानं आज या खास दिवशी शेअर केलाय. त्यानं लिहिलं की,इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं.
छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे.शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती.
एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….’राजा शिवाजी’.