पुण्यात रिंगरोडचे काम सुरू करणार, 27 हजार कोटी खर्च करणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा..

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतर्फे शहरासाठी करण्यात आलेल्या सुस-म्हाळुंगे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
तसेच २४x७ समान पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते बाणेर-बालेवाडी येथील मुख्य दाब नलिकांचे व पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
फडणवीस म्हणाले, पुण्याचे रिंगरोडचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी २७ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा पुण्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
यामुळे पुण्यातील रोजगार आणि उद्योगाची गुरुकिल्ली आहे. असे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे आता या रिंग रोडचे काम कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
Views:
[jp_post_view]