‘श्रीमंत गरीब’ राजपाल यादव! 200 कोटींची संपत्ती तरी 9 कोटीचं कर्ज फिटेना ; काय आहे प्रकरण?


पुणे : बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव 9 कोटींच्या चेक बाउन्स प्रकरणी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. 2010 मध्ये घेतलेल्या एका कर्जाची परतफेड न करू शकल्याने यादव सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मात्र अफाट संपत्ती असून देखील त्यांचे कर्ज का फिटेना या चर्चामुळे सोशल मीडियावर नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलीवूडचा लाडका अभिनेता राजपाल यादव याचे घर उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंडारा गावातील आहे. त्याचे घर 8 एकरमध्ये पसरलेले आहे. 8 एकरांवर पसरलेल्या या घराची किंमत बाजारभावानुसार 50 कोटी रुपये इतकी आहे.

तसेच एखाद्या भव्य राजवाड्याप्रमाणे घराला एक भव्य गेट आहे. या कॅम्पसमध्ये एक मंदिर आहे. राजपाल यादव यांचे 200 एकर बागायती शेत जमीन आहे. शाहजहांपूरच्या एका आलिशान भागात त्याच्याकडे 50 ते 60 कोटी रुपयांचा भूखंड आहे. इतकी अफाट संपत्ती असून राजपाल यादवची स्थिती अशी का? नऊ कोटीचे कर्ज फेडता का येईना असा सवाल उपस्थित होत आहे.

जो अभिनेता वर्षाला कोट्यवधी रुपये कमवतो,ज्याच्याकडे लक्झरी गाड्या आहेत तो नऊ कोटीच्या कर्जासाठी जेलमध्ये कसा काय जाऊ शकतो?त्याच्या संपत्तीचा आकडा समोर आल्यावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!