जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीची आढावा बैठक ! अचारसंहीता लवकरच लागण्याची शक्यता ….


पुणे: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी (पुणे ग्रामीण), सर्व उपविभागीय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सर्व तहसीलदार उपस्थित होते.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना दिल्या. सर्व तडीपार प्रकरणांचा गुणवत्तेवर निपटारा करणे, दारूबंदी आदेश निर्गत करणे, शवबंदी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणे तसेच यापूर्वीच्या निवडणुकीतील गुन्ह्यांचा पाठपुरावा करणे यासंबंधी स्पष्ट निर्देश देण्यात आले.

       

ईव्हीएम व्यवस्थापनासंदर्भात पोलीस आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, तसेच ईव्हीएम स्ट्राँग रूमला पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करावी अशा सूचना देण्यात आल्या. याशिवाय ईव्हीएमची योग्य हाताळणी, सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक माहिती भरणे, मतदार यादी अद्ययावत ठेवणे, मतदान वाढीसाठी मतदार जागृती अभियान राबवणे आणि सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीत निवडणुकीसंबंधित सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे काटेकोरपणे पार पाडाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी केल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!