महसूल मंत्र्यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! पाणंद रस्त्यांची आता सातबाऱ्यावर होणार अधिकृत नोंदणी…

मुंबई,: राज्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजनेची चर्चा सुरू आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करणार आहे. अशातच आता महसूल मंत्री बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे शेत रस्त्यांची नोंद सातबारा उताऱ्यावरील इतर हक्क या सदरात केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता पानंदरस्त्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर होणार आहे.या रस्त्यावरून भविष्यात वाद उद्भवू नये यासाठी हे डिजिटल रेकॉर्ड सुद्धा तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरून नाहक कोर्ट कचेरीचा प्रश्न उद्भवणार नाही.
मुख्यमंत्री बळीराजा पानंदरस्ते योजना या योजनेचा उद्देश शेतात जाण्यासाठी थेट आणि पक्का रस्ता व्हावा हा आहे. या योजनेसाठी राज्य सरकार सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करणार असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले. योजनेसाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघनिहाय समिती स्थापन करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व शेत रस्त्यांचे अगोदर अचूक सीमांकन करण्यात येईल. यामध्ये रस्त्यांची लांबी, रुंदी, दिशा आणि सीमा निश्चित करण्यात येतील. या सर्व बाबींची नोद साताबारा उतार्यावर करण्यात येणार आहे. सातबारा उतार्यावरील इतर हक्क या रकान्यात या पाणंद रस्त्यांची नोंद होईल. ग्राम महसूल अधिकारी ही नोंद करणार आहेत. संबंधित मतदारसंघातील आमदार दरमहा बैठक घेऊन या कामाचा आढावा घेतील, असे महसूलमंत्र्यांनी जाहीर केले आहे.