महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्या कामकाजात बदल, आता प्रत्येक गावात जाऊन…


मुंबई : सध्याच्या महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय अधिकार्‍यांनाही लोकांमध्ये जाऊन काम करणे बंधनकारक असणार आहे. यामुळे लोकांची कामे उरकणार आहेत.

यामध्ये महसूल विभागात गतिमान कारभारासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकार्‍यांनी दर आठवड्याला गाव भेटी देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये अधिकार्‍यांनी सरकारच्या योजनांची उत्तमरित्या अंमलबजावणी करण्यात यावी, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. यामुळे अधिकाऱ्यांना पालन करणे आवश्यक असणार आहे.

यामध्ये जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकार्‍यांनी आपल्या गाव भेटी दरम्यान क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज यादृच्छिकरित्या व अचानक तंत्राचा वापर करुन तपासावे. तसेच सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या पार पडत आहे, याची खात्री करावी, असेही सांगण्यात आले आहे.

याबाबत महसूल विभागाकडून एकूण अकरा कलमी परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. क्षेत्रीय यंत्रणेवर नियंत्रण राहण्याबाबत नियोजन करावे व दौर्‍यांमधून सकारात्मक परिणाम दिसून यासाठी दक्षता घ्यावी, असंही या परिपत्रकात नमूद केलं आहे.

तसेच खेड्यातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचं निराकरण करावं. संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची सर्वसामान्यांशी वागणूक सौजन्यपूर्ण व संवेदनशीलतेची आहे, याबाबत लोकांशी संवाद साधून खातरजमा करावी. इतर अधिकारी आपले कर्तव्य निभावत असल्याची खात्री करावी, असं म्हटलं आहे.

तसेच आपले सरकार पोर्टल, पी.जी. पोर्टल, पी. एम. जी पोर्टल, e-mutation, ई-पिकपाणी, e.Qj court यांसारख्या ऑनलाईन सुविधांमधील कामकाजाचा आढावा घ्यावा. असे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे काम वाढणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!