हवेलीत महसूल प्रशासनाकडून अवैद्य उत्खनन व वाहतुकीवर कारवाई सुरू; मुरुम वाहतुक करणारा हायवा घेतला ताब्यात; महसूल, परिवहन विभाग कारवाई सुरु ठेवणार…


उरुळीकांचन : अवैद्यरीत्या मुरुम उत्खनन करुन बेकायदा वाहतुक करणाऱ्या वाहनांवर हवेली महसूल प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली असून सोरतापवाडी फाटा येथे बेकायदा वाहतुक करणाऱ्या हायवा डंपरला महसूल प्रशासनाने सोमवार
(दि.६) रोजी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

सोरतापवाडी फाट्याजवळ शुक्रवार (दि.३) रोजी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्यानंतर माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केले होते.त्यानंतर हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी महसूल प्रशासनाला अवैद्य वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई सुरुवात करण्यात आली आहे. उरुळीकांचन मंडळ अधिकारी कार्यालयाकडून सोमवारी या ठिकाणी अवैद्य वाहतुक करणारा हायवा डंपर उत्खनन केलेल्या मुरुमासहीत ताब्यात घेतला असून महसूल प्रशासनाने पंचनामा करुन कारवाई केली आहे.

उरुळीकांचन मंडळ अधिकारी माधुरी बागवे ,ग्राममहसुल अधिकारी प्रियंका सुंदरडे तसेच पथकाने ही कारवाई केली आहे. तसेच वाहन जप्त करुन अप्पर तहसील कार्यालय लोणीकाळभोर येथे जप्त करण्यात आले आहे. महसूल कायद्यान्वये वाहनावर दंडाची कारवाई होणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय कारवाई करणार…

पुणे- सोलापूर रस्त्यावर अवैद्यरीत्या व अवजड वाहतुक करणाऱ्या वाहनांवर पुणे प्रादेशिक परिवहन विभाग आता लक्ष ठेवणार आहे. महामार्गावर नियम डावलून अवैद्य व अवजड वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर मोठ्या स्वरुपात दंडात्मक कारवाईचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!