महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले! परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे 20 हजारांच्या लाचेप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात, कारवाईने खळबळ…


बीड : महसूल विभागाचा कणा समजल्या जाणाऱ्या परळीच्या तहसील कार्यालयातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.बीड जिल्ह्यातील परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. या लाच प्रकरणात त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत

समोर आलेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला सालसी म्हणजेच ऐपतीचे प्रमाणपत्र हवे होते.हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तडजोडीअंति वीस हजार रुपये देण्याचे ठरवले.
दरम्यान 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराकडून काही दिवसापूर्वी करण्यात आली होती. या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. दरम्यान, तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली. मात्र एसीबीने अत्यंत चपळाईने या प्रकरणातील मागणीचे आणि आवश्यक पुरावे गोळा करत त्यांच्यावर कारवाई केली.

दरम्यान तहसीलदार मुंडे यांना घेऊन एलसीबीचे पथक बीडकडे रवाना झाले असून तहसीलदार मुंडेंवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बीड एसीबीकडून केला जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!