पुण्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा कारनामा ; माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव मगच तुला मुलं….; सुनेवर अतिप्रसंग केल्यानं खळबळ

पुणे : पुण्यातील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांन आपल्या सुनेवरच अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुनेला मूल होत नसल्यामुळे सासऱ्याने सुनेला आपत्य होण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. या प्रकाराने खळबळ उडाली असून सुनेने थेट पोलिस ठाणे गाठत सासऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने सासरा सुनेच्या नात्याला काळिमा फासला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सहकार नगर परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली. तीस वर्षीय विवाहित महिलेचं ३५ वर्षीय तरूणासोबत लग्न झाले होते. महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. मात्र, दोघांना अपत्य होत नव्हते. महिला गरोदर राहत नव्हती. तरूण मूल होण्यासाठी सक्षम नसल्याचे कुटुंबियांना माहिती होते.मात्र, तरीही पीडित महिलेचे त्या पुरूषासोबत लग्न लावून दिले. मात्र, यानंतर सासऱ्याची नियत फिरली. सासरा हा निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त असल्याची माहिती आहे. लग्नानंतर सासरे सुनेच्या खोलीत गेले. नंतर सुनेला, ‘मुलाकडून तुला अपत्य होणं शक्य नाही. माझ्याकडूनच या गोष्टी कराव्या लागतील. माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव’, असं त्यांनी सांगितलं.या गोष्टीला सुनेनं नकार दिला. तिने सासर्याच्या तावडीतून स्वतःची सुटका केली आणि थेट पोलिसांना सर्व प्रकारं सांगून सासऱ्या विरोधात तक्रार केली
या प्रकरणी पोलिसांनी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह त्यांची पत्नी आणि पीडितेच्या पतीविरोधात सहकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
