21 तारखेला लागणार निकाल, राज्यात कुठे, किती झालं मतदान? आकडेवारी आली समोर…


पुणे : मंगळवारी काल (ता.2 ) महाराष्ट्रातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झालं. मात्र काही ठिकाणी निवडणूक न्यायालयीन कचाट्यात अडकली होती. या पेचामुळ 24 नगरपालिका आणि 154 सदस्यांच्या निवडीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

त्यामुळेच काल (2 डिसेंबर) आणि 20 तारखेला होणाऱ्या दोन्ही टप्प्यातील मतदानाची एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असून सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल त्याच दिवशी लागणार आहे. नागपूर खंडपीठाने काल हा निर्णय जाहीर केला.

मात्र असे असेल तरी काल राज्यभरात इतर 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी भरघोस मतदान झालं. राज्यभरातील नागरिकांनी लाखोंच्या संख्येने पुढे येऊन मतदानाचा हक्क बजावला.

कुठे काही गोंधल, मारामारी, कधी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना समोर आल्या. कुठे पैसेवाटपाचे आरोप झाले, त्यामुळे निवडणुकीला गालबोट लागलं, मात्र तरीही राज्यात मोठ्या प्रमाणात मतदान झालं. राज्यभरात एकूण कुठे, किती मतदान झालं त्याची सविस्तर अंतिम आकडेवारी समोर आली आहे. ती आपण जाणून घेऊयात…

       

राज्यात कुठे, किती टक्के मतदान ?

नाशिक जिल्हा(अंतिम)

एकूण 68.34 टक्के – अकरा नगरपरिषद.

पिंपळगाव 73.21 टक्के

मनमाड 63.61 टक्के

भगूर 73.28 टक्के

नांदगाव 60.28 टक्के

सिन्नर 67.65 टक्के

सटाणा 67.54 टक्के

त्र्यंबकेश्वर 85.66 टक्के

इगतपुरी 68.68 टक्के

ओझर 62.31 टक्के

चांदवड 74.52 टक्के

येवला 73.91 टक्के

वाशिम नगर परिषद/नगर पंचायत निवडणूक 2025…
रिसोड : 71.22 %

मंगरुळपीर : 65.76 %

कारंजा : 62.13 % मालेगाव : 68.32%

सरासरी एकूण…65.47%

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्हातील एकूण 06 नगरपरिषद निवडणूकीसाठी सकाळी 7:30 ते 05:30 पर्यंत अंतीम मतदान टक्केवारी.

कन्नड नगरपरिषद 76.83 टक्के.

पैठण नगरपरिषद 73.74 टक्के.

खुल्ताबाद नगरपरिषद 82.26 टक्के

वैजापूर नगरपरिषद 73.30 टक्के

गंगापूर नगरपरिषद 71.75 टक्के

सिल्लोड नगरपरिषद 74.51 टक्के

जामखेड नगरपालिका निवडणूक 2025

एकूण नगरसेवक २४ – उमेदवार १०२ नगराध्यक्ष १ – उमेदवार ९

एकूण मतदान •– ३३१६१

झालेले मतदान • – २५१२२

सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक 1 मध्ये 83.09% एवढे झाले तर सर्वात कमी मतदान प्रभाग क्रमांक 8 मध्ये 67.4% झाले.

इगतपुरी
इगतपुरी नगर परिषद निवडणूक अंतिम मतदान आकडेवारी

एकूण नगरसेवक 21 – उमेदवार 70

नगराध्यक्ष 1 – उमेदवार 4

एकूण मतदान– 25077

झालेले मतदान–. 17224

एकूण टक्केवारी-. 68.68%

करमाळा ( सोलापूर)

करमाळा नगर परिषद

पुरुष मतदान 8341

महिला मतदान 7754

इतर मतदान 1

एकूण मतदान 16096

एकूण टक्केवारी 72.78%

गोंदिया मतदानाची अंतिम टक्केवारी

गोंदिया 62.80%

तिरोडा 65.62%

गोरेगांव 80.90%

सालेकसा 84.90%\

एकुण टक्केवारी : 73.55 %

परभणी

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तब्बल 72.55 टक्के मतदान,

सोनपेठ नगरपालिकेत सर्वाधिक 78.1 टक्के मतदान

तर सेलू येथे सर्वात कमी 67.71 टक्के मतदान.

धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी एकूण 68.97 टक्के मतदान
धाराशिव -61.14

तुळजापूर – 80.28

नळदुर्ग – 73.17

उमरगा – 66.81

मुरूम -69.81

कळंब -72.69

भूम -79.21

परांडा -78.13

एकूण – 68.97%

गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 70.60 टक्के मतदान
यात आरमोरी नगरपरिषद 72.85 टक्के, वडसा(देसाईगंज) 72.48 तर गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रात 68.26 टक्के मतदान झाले.

सातारा

सातारा जिल्ह्यातील नगरपालिकेत एकूण 66.59% मतदान; मेढा नगरपंचायत मध्ये 84.23 टक्के मतदान तर रहिमतपूर नगरपालिकेत सर्वाधिक 81.20% मतदान

पाचगणी 77.45%

सातारा 58.54%

मलकापूर 68.05%

म्हसवड 79.85%

वाई 72.98%

कराड 69.91%

रहिमतपूर 81.20%

मेढा 84.23%

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!