प्रचंड गदारोळात ‘यशवंत’च्या जमीन विक्रीचा ठराव मंजूर! संचालक मंडळाने पाऊणतासात सभा गुंडाळली! सभेत पहिल्याच विषयावरून रणकंदन…

जयदीप जाधव
उरुळीकांचन : विषयपत्रिकेवरील पहिल्याच विषयावरुन प्रचंड गोंधळ झाल्याने यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीनविक्रीसह विषय पत्रिकेवरील सर्व १३ विषय संचालक मंडळाने अभूतपूर्व गोंधळात मंजूर करीत केवळ पाऊण तासात कारखान्याची जमीन विक्रीची सभा गोंधळात गुंडाळली आहे. तर आक्रमक सभासदांनी सभासदांना जमीन विक्रीच्या ठरावात अधिक चर्चा करुन न देता आक्रमक पवित्रा घेऊन संचालक मंडळाला पाठिंबा दिला आहे.
थेऊर (ता.हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा जमीन विक्रीच्या ठरावासह भागभांडवल उभारणीस १३ विषय विषय पत्रिकेवर घेऊन सर्वसाधारण सभेचे आयोजन कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयो जित करण्यात आली होती. या विषय पत्रिकेवरील पहिल्याच विषय असलेल्या मागील २८/१२/२०१० च्या सभेचे वृत्तांत वाचून कायम करणे या विषयावरुन सभेस अभूतपूर्व गोंधळास सुरुवात झाली.या सभेस सभासद पांडुरंग काळे यांनी कारखान्याचा मागील इतिवृत्तांत तसेच सभासदांची देणी कारखान्याने का दिली नाही ? म्हणून धारेवर संचालक मंडळाला जाब विचारण्यात आला.
मात्र संचालक मंडळानी कारखान्याकडे शिल्लक नाहीतसेच कारखाना काही निर्णय घेण्यास प्रयत्न करीत असल्याचे सभेच्या निदर्शनास दिले. त्यामुळे सभेस सभेस प्रचंड गदारोळास सुरुवात झाली. त्यानंतर सभासद सागर चौधरी यांनी कारखाना गेली १३ वर्षे बंद असून कारखान्याच्या भविष्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा व मागील १३ वर्षात काय झाले ? याच्याशी सभासदांना देणघेण नसून सभा विषय पत्रकांच्या मुद्दावर चालावी म्हणून आक्रमक भूमिका घेतली. या भूमिकेवर सभासदांनी प्रतिसाद देत सभेसाठी विषय मंजूर करुन घ्यावेत अशी मागणी केली. या मागणीवर सभासद पांडुरंग काळे, विकास लवांडे, धनंजय चौधरी यांचे समाधान न झाल्याने काही वेळ कार्यकारी संचालक कौलास जरे यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला. या गोंधळात संचालक मोरेश्वर काळे यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय वाचत सभेस ठराव मंजूर आहे का ? म्हणून आवाजी मतदानात सभासदांनी सर्व ठराव मंजूर घोषणा देत संचालक मंडळाने सभा आटोपती घेतली आहे.
दरम्यान या सर्वसाधारण सभेत कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याची ९९.२७ एकर जमीन पुणे बाजार समितीस विक्री करण्याचा महत्वपूर्ण ठराव गोंधळात मंजूर करुन घेतला आहे. तसेच कारखान्याचा नफातोटा ताळेबंद, भागभाडवली उभारणीस मान्यता देणे,कारखान्याचा ड्यु-डिजीजन्स अहवलावर चर्चा करणे तसेच संस्थेच्या नावाबदलास मान्यता देणे हे विषय मंजूर करुन घेतले आहे. दरम्यान सभेत अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष किशोर उंद्रे, संचालक मोरेश्वर काळे, राहुल घुले , अमोल हरपळे ,योगेश काळभोर यांनी सभासदांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. या सभेसाठी सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित
होते.