रिझर्व्ह बँकेचा कोटक महिंद्रा बँकेला दणका; तब्बल 62 लाखांचा दंड ठोठावला, कारण समोर…


पुणे:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील सर्व बँकांच्या कामकाजाच नियमन केलं जातं आणि त्यावर नियंत्रण देखील ठेवले जातात. आता याच रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.आरबीआयनं बँकिंग नियमांचं पालन करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्याबद्दल कोटक महिंद्रा बँकेला 62 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्धीपत्रक जारी करत कोटक महिंद्रा बँकेला 62 लाख रुपयाचा दंड ठोठवला असल्याची याबाबत माहिती दिली आहे.आरबीआयनं कोटक महिंद्रा बँकेवरील कारवाईबाबत माहिती देताना म्हटलं की ॲक्सेस टू बँकिंग सर्व्हिसेस- बेसिक सेविंग्ज बँक डिपॉझिट अकाऊंट , बिझनेस कॉरस्पॉन्डंटस संबंधित नियमांशिवाय क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज रुल 2006 चं पालन करण्यात बँक कमी पडल्याचं समोर आलं आहे. यामुळं बँकेला 11 डिसेंबरच्या आदेशानं 61.95 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी 31 मार्च 2024 ला आरबीआयकडून बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत वैधानिक पर्यवेक्षण आणि मूल्यांकन करण्यात आलं होतं. यामध्ये कोटक महिंद्रा बँकेनं बीएसबीडी अकाँऊट अशा खातेदारांची उघडली ज्यांच्याकडे पहिल्यापासून बँक खाती होती हे आरबीआयच्या निदर्शनास आलं. याशिवाय बँकेनं निश्चित मर्यादेबाहेर जाऊन काही कामांसाठी बिझनेस कॉरस्पाँडटस् सोबत करार केले होते. याशिवाय बँकेनं काही कर्जदारांबाबतची चुकीच्या पद्धतीनं क्रेडिट इन्फॉरमेशन कंपन्यांना दिली होती.

       

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या संदर्भात कोटक महिंद्रा बँकेला अगोदर नोटीस दिली होती, त्याद्वारे कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. यानंतर बँकेनं दिलेल्या उत्तरांचा विचार केल्यानंतर आरबीआयला बँकेवरील आरोप खरे असल्याचं आढळून आल्यानं दंडाची कारवाई करण्यात आली…
..
बँकेकडून स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये देखील याबाबत माहिती दिली आहे. कोटक महिंद्रा बँकेवरील कारवाईचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असं आरबीआयनं सांगितलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!