आरक्षणाचा मुद्दा तापला ; सरकारचं शिष्टमंडळ भेटण्यापूर्वी मनोज जरांगेची यांची मोठी घोषणा..


पुणे : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसणार आहेत. यासाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाले आहेत मात्र त्यांना रोखण्यासाठी सरकारकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत.आज सकाळी सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. दोघे मिळून जरांगे यांची समजूत काढणार. मात्र, सरकारचे शिष्टमंडळ भेटण्यापूर्वीच जरांगे यांनी थेट आपली भूमिका स्पष्ट केली असून ते आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या आंदोलनावर सरकारने अटी शर्ती लागू केल्या आहेत.समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्यात. अशी एक दिवसाची परवानगी देणे म्हणजे गोरगरिबांची चेष्ठा आहे. काहीच होऊ नये, म्हणून तुम्ही जाणूनबुजून एकच दिवसाची परवानगी दिली. गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका, मने जिंकण्याची तुम्हाला संधी आलीये. कधीच मराठा समाज तुम्हाला विसरणार नाही. मात्र तुम्ही एक दिवसाची परवानगी दिली, त्यामुळे मराठा समाजात नाराजी असल्याच जरांगे पाटील यांनी म्हटल आहे.

दरम्यान सरकारचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पोहोचण्याच्या अगोदरच मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईमध्ये आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ते अजूनही ठाम आहेत. काहीही झालं तरी मागे हटणार नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!