Reservation : आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, पुणे-सातारा महामार्ग तब्बल पाच तास रोखला..
Reservation : खंडाळा तालुक्यातील धनगर समाजाने आरक्षणाच्या लढाईसाठी पुणे सातारा आणी सातारा पुणे महामार्गा वरील पारगावच्या हद्दीत आंदोलन सुरू केले. महामार्ग सुमारे ५ तास रोखून ठेवला. यामुळे सकाळपासून महामार्गावरील वाहतुक पूर्णपणे बंद पाडली. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे .
धनगर आरक्षणासाठी खंडाळ्यात पुणे बंगळूरू महामार्ग रोखण्यात आला आहे. पुणे आणि सातारा बाजूकडे पंधरा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक मागील काही तासांपासून ठप्प आहे. धनगर आरक्षणासाठी समाजाच्यावतीने महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. Reservation
गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील धनगर समाजाने एकत्रित येऊन राज्य व केंद्र सरकारकडे आरक्षणाची वेळोवेळी मागणी केली. त्यासाठी अनेकदा आंदोलने, मोर्चे आणि उपोषणे करुन राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न या समाजाने केला.
प्रत्येक वेळी राज्य सरकारने फक्त आश्वासन दिली व वेळकाढूपणाचे धोरण अवलंबून समाज बांधवांची फसवणूक केली. या समाजात सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे .
त्याचा राग व्यक्त करण्यासाठी आज खंडाळा तालुक्यातील धनगर समाजाचे कार्यकर्ते बहुसंख्येने एकत्रित येऊन खंडाळा तालुक्यातुन जाणाऱ्या मुंबई बेंगलोर महामार्ग क्र.४ वर उतरुन दोन्हीही महामार्गावरील वाहतूक रोखुन धरली. त्या मुळे वाहतूक ठप्प होवुन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी हजारो धनगर बांधव, महिला, युवक, युवती या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाल्या आहेत. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणाही या वेळी देण्यात येत आहेत. महामार्ग बंद झाल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.