शेतकऱ्यांची सुटका ! खडकवासला प्रकल्पातून हवेली , दौंड व इंदापूर तालुक्यासाठी उन्हाळी आवर्तन सुरु…!


पुणे : खडकवासला धरण साखळीतून हवेली , दौंड व इंदापूर तालुक्यासाठी आजपासून (दि. 1 मार्च) सुरुवात होणार आहे. पुढील 55 दिवसांसाठी आवर्तनाचे नियोजन खडकवासला पाटबंधारे विभागाने सुरू केले आहे.

खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण सध्या 18.74 टीएमसी म्हणजेच 64.27 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 5 फेब्रुवारी पर्यंत खरीप हंगामातील आवर्तन देण्यात आले होते. परंतु पाण्याची परिस्थिती
निर्माण झाल्याने हे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, पहिले उन्हाळी आवर्तन संपल्यानंतर उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जेवढे पाणी शिल्लक असेल, त्यानुसार दुसर्‍या आवर्तनात किती पाणी सोडायचे, हे ठरविले जाणार आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!